24 April 2024 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

आंदोलन हिंसक | ४५ वर्षीय आंदोलक नवनीत यांचा आयटीओ पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू

A 45 year old Navneet, killed in ITO, police firing

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती.

मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार आणि फायरिंग केल्याचं वृत्त आहे. यामध्ये ४५ वर्षीय आंदोलक नवनीत यांचा आयटीओ पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: However, the farmers reached ITO without going this route. As a result, the police blocked the farmers and a scuffle broke out between the police and the farmers. There are reports of police being beaten and fired at as stone pelting started. Navneet, a 45-year-old protester, was killed in an ITO police firing.

News English Title: A 45 year old Navneet was killed in an ITO police firing news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x