26 April 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

शेतकऱ्यांना भडकावणारा दीप सिद्धू भाजपा कार्यकर्ता | पंतप्रधानांबरोबर फोटो | शेतकरी आक्रमक

Farmers Union Gurnam Singh Chaduni, Accused Deep Sidhu, Inciting farmers

नवी दिल्ली, 27 जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

“दीप सिद्धू हा शीख नसून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे, ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत.” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे दिल्लीत झालेल्या हिंसाचारात लक्खा सिधाना याचं नाव पुढे आलं आहे. लक्खा सिधाना यानेच ही हिंसा भडकवल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लक्खाचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पंजाबच्या गावांमधील लोकांना तो भडकवताना या व्हिडीओत दिसत आहे. तसेच सरकारला झुकवायचं असेल तर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत जायला हवं असं सांगतानाही तो या व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लक्खावर पंजाबमध्ये दोन डझन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दिल्ली पोलीस सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून लक्खा विरोधातील पुरावे गोळा करत आहे.

 

News English Summary: Haryana Chief of Indian Farmers Union Gurnam Singh Chaduni has accused Deep Sidhu of inciting farmers. Farmer leader Rakesh Tikait has also said that Deep Sidhu is a BJP activist and has a photo with the Prime Minister.

News English Title: Farmers Union Gurnam Singh Chaduni has accused Deep Sidhu of inciting farmers news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x