सब 'जाणकर' भी? जानकर म्हणतात बारामती मीच जिंकणार
बारामती : आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष भाजपकडे लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या ५० जागा मागणार असून, आमचं ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सत्तेपासून रोखाने हेच ध्येय असल्याचे महादेव जानकर म्हणाले. यंदा बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि बारामतीची निवडणूक सुद्धा मीच जिंकणार असं सुद्धा महादेव जानकर म्हणाले.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत विधान करताना म्हटलं की, मला माढा मतदारसंघ मागच्या वेळीच हवा होता. परंतु राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोघांनी स्वतःच्या पक्षाचे हित साधत आमच्याविरुद्ध षड्यंत्र रचून स्वतःकडे तो मतदारसंघ घेतला. पुढे ते म्हणाले की, माझं बारामतीतूनच निवडणूक लढविण्याला प्राधान्य असेल असं ते म्हणाले.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. आता त्यांनी पुन्हा बारामतीतून निवडणूक लढविण्याचा मानस बोलून दाखविला आहे. परंतु चर्चे दरम्यान पत्रकारांनी धनगर समाजाच्या आरक्षासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी,’कमिटी नेमली असल्याचे सांगत तो अहवाल सकारात्मक येईल त्यावेळी सरकार नक्कीच आरक्षण लागू करेल असं जानकर म्हणाले.
पुढे चर्चे दरम्यान जानकरांनी एक दावा केला कि, मी सत्तेत आलो असलो तरी ते एकट्या धनगर समाजाच्या बळावर नाही आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू असून धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला हवं असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर पुढे मजबूत कमाई करून देईल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
- Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?
- Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय? पुढे काय होणार?
- SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची मजबूत परतावा देणारी FD योजना, बचतीवर मोठा व्याज दर मिळेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
- Multibagger Stocks | अल्पावधीत 925% परतावा देणारा शेअर पुन्हा बंपर परतावा देणार, दिग्गजांनी खरेदी केले शेअर्स