23 April 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून अक्षयच्या ट्विटची 'फुल'कॉपी पेस्ट

Saina Nehwal, Copy paste, Actor Akshay Kumar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये अजय देवगण सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अँपचा अँबेसिडर आहे. अक्षय कुमार एक अघोषित मोदी भक्त आहे. लता मंगेशकर यातर मोदींना मोठे बंधू मानतात आणि अमित शाह यांनी भाजपच्या ‘संपर्क पे चर्चा’ अभियानावेळी तर लता दीदींच्या घरी विशेष भेट दिली होती. तर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे बीसीसीआय’शी संबंधित असल्याने आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा सध्या बीसीसीआय’चे सचिव आणि अघोषित सर्वेसेवा झाले आहेत. यावरून कोहली आणि अर्जुन तेंडुलकरच्या भविष्यासाठी सचिनची अवस्था समजू शकतो. त्यात सायना नेहवाल’ने तर अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, शेतकरी हा देशाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, ते दिसूनही येतंय. चला सौहार्दपूर्णपणे या समस्येचं समाधान काढूयात, ना की देशाला तोडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायंचं. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…”, असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे. अक्षयच्या ट्विटची कॉपीच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केल्याचे दिसून येते. कारण, सायनाने केलेले ट्विट व अक्षयच्या ट्विटमधील शब्द न शब्द सेमच आहेत. अक्षयने बुधवारी दुपारी 2.07 वाजता ट्विट केले असून सायनाने त्याच दिवशी रात्री 10.26 वाजता ट्विट केलंय. त्यामुळे, इंडिया टुगेदरच्या म्हणणाऱ्या सेलिब्रिटींचं ट्विट टुगेदर झाल्याचं दिसून येत आहे.

 

News English Title: Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences said Saina Nehwal.

News English Title: Saina Nehwal made a copy paste of tweet made by actor Akshay Kumar news updates.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x