28 March 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

क्रिकेटर्स ट्विटचा सपाटा | संदीप शर्माचं ट्विट डिलीट | जय शहा ट्रेंडिंग | राजकीय दबावाची चर्चा

BCCI secretary Jay Shah, Rihanna, Farmers protest

मुंबई, ०४ फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित शर्मा सहित इतर क्रिकेटर्सनी देखील ट्विट केलं आहे.

आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. या सर्वांना उत्तर म्हणून देशातील अनेक सेलिब्रेटिंनी ट्विट केले. सोशल मीडियावर जणू ट्विटरवॉर सुरू झाला आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली , मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रग्यान ओझा यांनी हा देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, बाहेरच्यांनी त्यात नाक घुसवायची गरज नाही असा सल्ला दिला. पण, सनरायझर्स हैदबाद संघाच्या संदीप शर्माचं मत काही वेगळंच होतं. त्यानं ट्विट केलं की,”या लॉजिक नुसार कुणालाच कुणाची काळजी करायला नको. प्रत्येक परिस्थिती ही कुणाचातरी अंतर्गत मुद्दा असतो. पण, हे ट्विट त्याच्या विरोधात जाणार असल्याचे समजताच त्यानं ते डिलीट केलं होतं. तोपर्यंत त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान अचानक सर्व क्रिकेटपटूंनी ट्विटचा सपाटा लावल्याने अमित शहा यांचे चिरंजीव आणि बीसीसीआय’चे सचिव जय शहा हे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले आहेत. त्यामुळे क्रिकेटर्सवर काही दबाव टाकला जातं आहे का अशी शंका समाज माध्यमांवर व्यक्त केली जातं आहे.

 

News English Summary: After international singer Rihanna, Meena Harris, the nephew of US President Kamala Harris, environmental activist Greta Thunberg, pornstar Mia Khalifa also tweeted on the farmer issue. Many celebrities in the country tweeted in response to all this. It’s like Twitterwar has started on social media. Great cricketers Sachin Tendulkar, Virat Kohli, head coach Ravi Shastri, Ajinkya Rahane, Rohit Sharma, Pragyan Ojha have suggested that this is an internal matter of the country and there is no need for outsiders to get involved. However, Sunrisers Hyderabad’s Sandeep Sharma had a different opinion. He tweeted, “According to this logic, no one should worry about anyone. Every situation is an internal issue. However, he deleted the tweet as soon as he realized that it would go against him. By then, screenshots of his tweet had gone viral on social media.

News English Title: BCCI secretary Jay Shah came in trend after Rihanna tweet on farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x