25 April 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

शेतकऱ्यांना दिल्लीत नो इंट्री | तर मोदींना देखील तामिळनाडूत नो इंट्री | थेट धमकी

PM Narendra Modi, Tamil Nadu, AFACC association of farmers

नवी दिल्ली, ०७ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरीकडे या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा आहे, त्यापार्श्वभूमीवर या शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना इशारा दिला आहे. ऑल फार्मर्स असोसिएशन को-ऑर्डिनेशन कमिटी (AFACC) चं म्हणणं आहे की, जर शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी नसेल आणि धरणं आंदोलन करणाऱ्या ठिकाणी पुन्हा वीज, पाणी सुविधा पुरवली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.

संघटनेचे अध्यक्ष पीआर पांडियन म्हणाले की, पंतप्रधान शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी देत नसतील तर तामिळनाडूतील शेतकरी त्यांना राज्याचा दौरा करू देणार नाहीत. शेतकऱ्यांसाठी दिल्ली सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि लोखंडी खिळे तातडीने हटवण्यात यावेत, शेतकऱ्यांची अवहेलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावी, याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं असा टोला पांडियन यांनी भाजपाला लगावला.

 

News English Summary: On the other hand, Prime Minister Narendra Modi’s visit to Tamil Nadu this month, the farmers’ association has warned the Prime Minister. The All Farmers Association Co-ordination Committee (AFACC) has said it will not allow Prime Minister Narendra Modi to enter Tamil Nadu if farmers are not allowed to come to Delhi and the dam agitation is not restored.

News English Title: We will not allow PM Narendra Modi to enter Tamil Nadu said AFACC association of farmers news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x