25 April 2024 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

5 वर्ष नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळलो म्हणून शिवसेनेत प्रवेश | 7 नगसेवकांची प्रतिक्रिया

Seven corporators, Vaibhavwadi, join Shivsena, MLA Nitesh Rane

मुंबई, ०९ फेब्रुवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

मागील 5 वर्षांपासून नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गेल्या 5 वर्षांत नितेश राणेंनी काही आश्वासनं दिली होती. ती पूर्ण केली नाही. तसेच त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. नगरपरिषद ही पहिल्यांदा झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीकाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी दिली आहे.

त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला प्रतिउत्तर दिलं आहे. व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर तिथे उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. ते आमच्या हृदयात आहेत. मात्र, वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती वाईट आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची प्रमाणिक भावना आहे. म्हणून आमचे 7 नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले.

 

News English Summary: The party will enter in the presence of Chief Minister Uddhav Thackeray. Along with these 7 people, there is also a former mayor and deputy mayor. The corporators have alleged that BJP MLA Nitesh Rane was putting pressure on his family till Monday.

News English Title: Seven corporators from Vaibhavwadi join Shivsena party in presence of CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x