25 April 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आठवड्यात ३ सुट्ट्या? | मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Employees, 3 days off, Weekly, Modi govt

नवी दिल्ली, ०९ फेब्रुवारी: कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार सरकारने 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावं लागणार असून आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची आहे. त्यामुळे 12 तास काम केल्यास 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी देता येऊ शकते.

श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वी चंद्रा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. अपूर्वी चंद्रा यांनी, “आम्ही कामावर ठेवणाऱ्या कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मूभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे. आम्ही काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे,” अशी माहिती दिली.

या पर्यायाचा वापर करण्यासाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी सहमती दिली तरच हा पर्याय वापरता येईल. दरम्यान, 1 एप्रिल 2021 पासून नवीन 4 कामगार कायदे लागू होणार असल्याची माहिती समजत आहे.

 

News English Summary: Employees are expected to get 3 days off. It will be finalized by the government to implement four new labor laws by the Ministry of Labor and Employment. It is understood that the government has decided to increase working hours in 4 days as per the new law. Employees will have to work 12 hours a day, with a limit of 48 hours per week. Therefore, if you work for 12 hours, you can work for 4 days and take 3 days off.

News English Title: Employees are expected to get 3 days off policy design by Modi govt news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x