25 April 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? | मनसेचा सवाल

MNS, Sandeep Deshpande, Shivsena, Mumbai water project

मुंबई, १० फेब्रुवारी: मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, महापालिका यासाठी ५.५० कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीची निवड करण्यात आली असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल या कंपनीकडून देण्यात येणार आहे.

दरम्यान, यावरून मनसेने शिवसेनेला लक्ष केलं आहे. यासंदर्भात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “खार पाणी गोड करायचं आहे की स्वतःच उखळ पांढर करायचं आहे? विरप्पन गॅंग चा लुटीचा नवा मार्ग” अशी टीका केली आहे.

दुसरीकडे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील यावरून सेनेला लक्ष केलं आहे. “तुम्हीपण प्रकल्पाचा प्रहार थांबवा!! एकिकडे पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची.. दुसरीकडे दानव बनून त्याच मुंबईच्या समुद्राचे पाणी “गोडे” करुन पर्यावरणावर प्रहार करायचा.. हा बालहट्ट म्हणजे आपणच पायावर मारलेली कुऱ्हाड आहे… केवळ आमची बोलून मुंबई आपली होत नाही..त्यासाठी स्वार्थापोटी,मुंबईला न परवडणाऱ्या, खर्चीक, मच्छीमारांना उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाचा प्रहार थांबवावा लागेल. अन्यथा दरवर्षी समुद्र आणि पावसाचे रौद्ररूप पाहतोच… भविष्यात मोठे हाहाकार मुंबईला बघावे लागतील!”, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

 

News English Summary: Mumbaikars will now be able to enjoy fresh water. A project to desalinate seawater has been approved to quench the thirst of Mumbaikars. The project to desalinate 200 million liters of sea water is expected to cost Rs 1,600 crore. Chief Minister Uddhav Thackeray is adamant that the project will cost four units of electricity to sweeten a liter of water.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande criticised Shivsena over Mumbai water project news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x