26 April 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भाजपला मनसेसोबत युतीची आशा? | भाजपकडून पुन्हा त्याच मुद्यावर भाष्य

BJP, Chandrakant Patil, MNS alliance, Raj Thackeray

पुणे, ११ फेब्रुवारी: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने स्वबळाची भूमिका घेतली आहे आणि त्यानुसार पक्ष विस्तार सुरु केला आहे. विशेष म्हणजे आज पर्यंत मराठी माणूस केंद्रस्थानी असणाऱ्या मनसेमध्ये इतर पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठी चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं.

तत्पूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी याच विषयाला अनुसरून मनसेने इतर भाषिकांच्या बाबतीत भूमिका बदलल्यास युती शक्य असल्याचं म्हटलं होतं. मात्र कालच्या पक्ष प्रवेशाने भाजपने पुन्हा तीच भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणं, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

News English Summary: Many BJP leaders had said that an alliance was possible if the MNS changed its stance on other speakers. However, with yesterday’s party entry, BJP has played the same role again. It is a good thing that Marathi activists and leaders are joining the Maharashtra Navnirman Sena. There may be an alliance with MNS, but they should change their position on other provinces, said BJP state president Chandrakant Patil.

News English Title: BJP State president Chandrakant Patil reacts on BJP alliance with MNS news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x