24 April 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

त्या २७ गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या | आ. राजू पाटील यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

MNS MLA Raju Patil, Minister Ajit Pawar

मुंबई, १२ फेब्रुवारी: मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती आमदार राजू पाटलांनी बोलून दाखवली होती. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी यापूर्वी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली होती.

दरम्यान, याच विषयावरून आमदार राजू पाटील यांनी पुन्हा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. कल्याण ग्रामीण मधील २७ गावांच्या विकासासाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटीचे विशेष पॅकेज द्या अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यापूर्वी देखील राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीतील विकास कामांना अनुसरून राज्य सरकारकडे सात्यत्याने पाठपुरावा करून निधी आणला आहे.

राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आमदार आहेत. मनसेची खिंड लढवण्याची जबाबदारी राजू पाटलांवर आहे. त्यामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा पाटील कसे करतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

आमदार राजू रतन पाटील यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांना 86 हजार 233 मतं मिळाली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झुंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80 हजार 665 मतं मिळाली होती. त्यामुळे आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची त्यांच्यावर विशेष जवाबदारी असणार आहे.

 

News English Summary: MLA Raju Patil has again followed up with Finance Minister Ajit Pawar. Deputy Chief Minister Ajit Pawar has demanded a special package of Rs 500 crore in the 2021-22 budget for the development of 27 villages in rural Kalyan. Even before this, Raju Patil has brought funds to the state government following the development works in Kalyan-Dombivali.

News English Title: MNS MLA Raju Patil has again followed up with Finance Minister Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x