28 March 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण | आ. पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

MLA Gopichand Padalkar, Sharad Pawar, Jehuri Ahilya Devi Holkar

मुंबई, १२ फेब्रुवारी: जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत.

दरम्यान, आजवर अनेक वेळा बेकायदेशीर उद्घाटनं झाली पण कधी गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र आमदार पडळकर प्रकरणी लगेच गुन्हा दाखल केला गेला, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे सतत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना चॅलेंज केलं आहे. जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन आज पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

 

News English Summary: A case has been registered against MLA Gopichand Padalkar for unveiling the statue of Jehuri Ahilya Devi Holkar. A case has been registered against Gopichand Padalkar and other activists at Jejuri police station. The process of filing offenses under various sections including violation of curfew order and obstruction of police work is underway.

News English Title: A case has been registered against MLA Gopichand Padalkar for unveiling the statue of Jehuri Ahilya Devi Holkar news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x