20 April 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

खडसेंकडून लोटसचं ऑपरेशन | तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

BJP corporators, join NCP party, Eknath Khadse

भुसावळ, १४ फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला जबर दणका दिला आहे. भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याचबरोबर भारतीय जनता पक्षामधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची वाट धरू लागले आहेत.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक आजी-माजी नगसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, मला जितकं छळाल, तितकं भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल. माझा छळ भारतीय जनता पक्षाला महागात पडेल, असा इशारा खडसेंनी भारतीय जनता पक्षाला दिला होता. त्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत येऊ लागले आहे.

 

News English Summary: Eknath Khadse, who joined the Nationalist Congress Party (NCP) a few days back, has slammed the BJP. As many as 31 former corporators from Bhusawal have joined the NCP. This has come as a shock to the Bharatiya Janata Party in the run-up to the municipal elections.

News English Title: 31 BJP corporators join NCP party in presence of Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x