25 April 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

अयोध्या राम मंदिर निर्माण | निधी संकलन करण्यासाठी RSS पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

RSS volunteers, MNS chief Raj Thackeray, Krishnakunj

मुंबई, १४ फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम जन्मभूमि येथे भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी देशभरातून निधी संकलनाचे काम सध्या सुरु आहे. या निधी संकलनाच्या अनुषंगानेच आज रा. स्व. संघाच्या काही सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

यासंदर्भात बोलताना RSS’चे सदस्य विठ्ठल कांबळे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. या मोहिमेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली. यावेळी श्याम अग्रवाल, सुरेश बगेरिया, देवकिनंदन जिंदल उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत आवश्यक आहे. ही मदत आम्ही करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray was met by members of the Rashtriya Swayamsevak Sangh. The meeting took place at Raj Thackeray’s ‘Krishnakunj’ residence. The visit was to raise funds for the construction of a Ram temple in Ayodhya. At this time Raj Thackeray promised to help as needed.

News English Title: RSS volunteers meet MNS chief Raj Thackeray at Krishnakunj news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x