25 April 2024 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

सांगलीत राजकीय भूकंप होणार? | चंद्रकांतदादांवर नाराज भाजप खासदार जयंतरावांच्या कार्यक्रमात

BJP MP Sanjaykaka Patil, jayant Patil, Chadrakant patil

सांगली, १५ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षीय कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, सदर बैठकीला भाजपचे खासदार असूनही संजयकाका पाटील या कार्यक्रमात गैरहजर होते. दुसरीकडे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते, परंतु खासदारांच्या गैरहजेरीने अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु बैठक संपतेवेळी खासदार संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले, तेव्हा चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते, खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटांच बाहेर आले. मात्र संजयकाकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे जाणवत होता.

चर्चेतून बाहेर पडल्यानंतर कोणाशीही काहीच संवाद न करता संजयकाका गाडीत जाऊन बसले. एवढंच नाही तर गाडीत बसताना दरवाजा जोरात बंद करण्यात आला, त्यावेळी तो आवाज खूप काही सूचित करणारा होता. लगेच एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ धावत आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला. मात्र तरी देखील खासदार थांबले नाहीत, त्यांनी तिथून निघून जाणं पसंत केले.

मागील काही दिवसांपासून सांगलीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार आग्रही होते. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे अशी भूमिका घेत माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी संजयकाका पाटील यांची मागणी होती, पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदलाचा निर्णय लोंबकळत ठेवल्याचा राग खासदारांना आला. पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार संतापले असावेत, अशी शक्यता उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्यावेळी संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात, हे काही कार्यक्रमांचे निमित्ताने आढळले आहे. या अगोदरही जयंत पाटील आणि संजयकाका पाटील एका बंद खोलीतून चर्चा करून एकत्र बाहेर पडल्याचे दिसले होते.

सदर कार्यक्रमावेळी संजयकाका ‘नको नको’ म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना आपल्या जवळ बसवून पंधरा मिनिटे चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक केले जात आहेत. भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित न राहणारे संजयकाका सांगलीतील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या मांडीला माडी लावून बसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’च्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर झालेली भेट नवी राजकीय समीकरणं तर निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. कारण तत्पूर्वी देखील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात संजयकाका हे अनुपस्थित होते.

 

News English Summary: Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil was in Sangli on the occasion of the party function. Sanjay Kaka Patil was absent from the meeting despite being a BJP MP. On the other hand, MLA Sudhir Gadgil, Suresh Khade and many other office bearers were present in the meeting, but the absence of MPs raised doubts in the minds of many. But at the end of the meeting, when MP Sanjaykaka Patil came to the meeting place, Chandrakant Patil had gone to the President’s bungalow for a change of office. But anger was clearly felt on Sanjay Kaka’s face.

News English Title: BJP MP Sanjaykaka Patil not happy in BJP may join NCP party news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x