23 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

RSS प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट | प. बंगाल निवडणूक तयारी?

RSS, Mohan Bhagwat, Bollywood actor Mithun Chakraborty

मुंबई, १६ फेब्रुवारी: सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.

2019 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली होती. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले होते. मात्र सदनात सतत अनुपस्थित राहात असल्याने त्यांनी 20 महिन्यांतच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच आहेत. यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांच्या खास भेटीने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

 

News English Summary: Sarsanghchalak Mohan Bhagwat met renowned actor Mithun Chakraborty. The discussion lasted for more than an hour and a half. Chakraborty said the visit was a family affair. However, the visit has political significance in the backdrop of the forthcoming West Bengal elections.

News English Title: RSS chief Mohan Bhagwat meets Bollywood actor Mithun Chakraborty west Bengal news updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x