24 April 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Twitter | भारतात लॉन्च केले Voice DMs फिचर | काय आहे वैशिष्ट्य

Twitter, voice DMS

मुंबई, १७ फेब्रुवारी: ट्विटरने डायरेक्ट मेसेजसाठी नव्या व्हॉईस मेसेजिंग फिचरसाठी टेस्टिंग सुरु केली आहे. बुधवार, 17 फेब्रुवारी पासून भारत, ब्राझील आणि जपान मधील युजर्ससाठी हे फिचर सुरु होईल. गेल्या वर्षी कंपनीने व्हॉईस ट्विट्स फिचर सुरु केले होते आणि आता युजर्स डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून व्हॉईस नोट्स पाठवू शकतात. व्हॉईस ट्विटप्रमाणे प्रत्येक व्हॉईस डीएम (Voice DMs) 140 सेकंदाचा असायला हवा. हे टेस्टिंग फिचर अॅनरॉईड आणि आयओएसयुजर्ससाठी उपलब्ध असतील.

ट्विटरवर व्हाईस नोट्स DM द्वारे पाठवणे अत्यंत सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम ट्विटरवर DMs मध्ये एखादे चॅट ओपन करा किंवा नवे चॅट सुरु करा. मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर एकदा व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा आणि रेकॉर्डिंग संपवण्यासाठी तोच आयकॉन पुन्हा एकदा टॅप करा. रेकॉर्ड केलेला मसेज पाठवण्यापूर्वी तुम्ही ऐकू देखील शकता. आयओएस युजर्स साठी थोडी वेगळी पद्धत वापरली जाते. मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंग आयकॉन दाबून ठेवा आणि आयकॉन स्वाईपअप करुन सोडून दिल्याने मेसेज पाठवला जाईल.

ट्विटरवरील हे डीएम फिचर केवळ अॅनरॉईड किंवा आयओएस युजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. परंतु, युजर्स ट्विटरवरील व्हाईस मेसेज वेब ब्राऊजरच्या माध्यमातूनही ऐकू शकतात. या नव्या फिचरमुळे युजर्संना व्यक्त होणे सोपे होईल. तसंच स्टोरीटेलर आणि श्रोतांसाठी एक चांगला अनुभव असेल.

 

News English Summary: Twitter has started testing for a new voice messaging feature for direct messaging. The feature will be available to users in India, Brazil and Japan from Wednesday, February 17. The company launched the voice tweets feature last year and now users can send voice notes via direct messaging. Like voice tweets, each voice DMs should be 140 seconds long. These testing features will be available for Android and iOS users.

News English Title: Twitter starts rolling out voice DMS in India news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x