25 April 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भंडारा आग प्रकरण | 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल | हे आहे कारण....

Two nurses, booked for negligence, Bhandara hospital, fire tragedy

भंडारा, १९ फेब्रुवारी: 9 जानेवारीला भंडारा जिल्हा हॉस्पिटलच्या न्यूबॉर्न केअर यूनिटमध्ये आग लागली होती. यात झालेल्या 10 नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये नर्स शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके यांच्या विरोधात IPC च्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यांच्या तपासात समोर आले आहे की, SNCU मध्ये आग लागल्याच्या 12 मिनिटपर्यंत नर्स तिथे पोहोचल्या नव्हत्या. मुंबईच्या कालीन येथील फॉरेंसिक लॅबद्वारे SNCU चे CCTV DVR च्या तपासात हा खुलासा झाला आहे. घटना घडली तेव्हा दोन्ही नर्स कुठे होत्या याचा तपास अद्यापही सुरू आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 9 जानेवारीला मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात आग लागली होती. या आगीमध्ये 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. यूनिटमधून सात बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते.

आगीनंतर वार्डमधील बाळांचे शरीर काळे पडले होते. या कक्षात काळा धूर दिर्घकाळ होता. या घटनेमधील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण मुलांच्या कक्षाचा दरवाजा उघडला तेव्हा यात कोणताही स्टाफ नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

 

News English Summary: On January 9, a fire broke out in the Newborn Care Unit of Bhandara District Hospital. A case of culpable homicide has been registered against 2 nurses in connection with the deaths of 10 newborns. A case under Section 304 of the IPC has been registered against nurses Shubhangi Satwane and Smita Ambildhake at the Bhandara police station.

News English Title: Two nurses booked for negligence in Bhandara hospital fire tragedy news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x