20 April 2024 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पेट्रोल दर वाढ | तुमचं वाहन नाही | पण रिक्षा, टॅक्सीचं भाडं वाढलं

Mumbai, Auto taxi, Fares hike

मुंबई, २२ फेब्रुवारी: शंभर रुपयांकडे झेपावलेल्या पेट्रोल , डिझेलच्या किंमतींचा परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. आता मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.

मुंबईत एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

या भाडेवाढीचे स्वागत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केले आहे. मागील पाच वर्षांपासून इंधनाचे दर वाढत होते. त्याशिवाय वाहनाचा मेन्टेनन्स आणि विमादेखील वाढला होता. तरीही भाड्यामध्ये एक पैशाची वाढ झाली नव्हती. आता पेट्रोल, डिझेलसह सीएनजीदेखील महाग झाला आहे. यामुळे काहीतरी फायदा होऊन दिलासा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे.

 

News English Summary: Auto and taxi fares will be increased in the MMR region in Mumbai. It has been decided to increase the fare of auto rickshaw from Rs 18 to Rs 21 and taxi fare from Rs 22 to Rs 25. The decision was taken at a meeting of the Transport Commissioner. Gasoline, diesel and gas prices have been rising for the past few days. So auto rickshaw and taxi drivers were in the sanctity of the movement. However, they are now relieved that the decision to increase the rent has been taken. However, the general public will now have to bear the brunt of the fuel price hike.

News English Title: Mumbai Auto taxi fares hike by 3 rupees in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x