19 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

New WhatsApp Privacy Policy | न स्वीकारल्यास काय होणार?

Whatsapp, re impose, privacy Policy

मुंबई, २३ फेब्रुवारी: नवीन वर्षाच्या सुरूवातीला नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतरही इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअँपने आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नवीन पॉलिसीबाबत कंपनीकडून युजर्सना पुन्हा एकदा नोटीफिकेशन पाठवलं जात असून १५ मे पर्यंत पॉलिसी स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की जर तुम्ही पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल. याबाबत व्हाट्सअँपने आपल्या सपोर्ट पेजवर महत्त्वाची माहिती दिली आहे.

तातडीने डिलीट नाही करणार अकाउंट:
१५ मे पर्यंत नवीन पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी तुमचं व्हाट्सअँप अकाउंट तातडीने डिलीट करणार नाही. मात्र जोपर्यंत पॉलिसी स्वीकारत नाहीत तोपर्यंत व्हाट्सअँप वापरण्याचा पूर्ण अ‍ॅक्सेस तुम्हाला मिळणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच व्हाट्सअँप’चे सर्व फिचर्स तुम्हाला वापरता येणार नाहीत.

मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत:
पॉलिसी न स्वीकारल्यास काही कालावधीसाठी युजर्सना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येतील, पण मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत.

डिलीट झालेलं अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही:
एकदा तुमचं अकाउंट डिलीट झाल्यास पुन्हा ते अकाउंट तुम्हाला वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपकडून कायमस्वरुपी अकाउंट डिलीट केलं जातं. अकाउंट डिलीट झाल्यानंतर युजरला त्याचा कोणताच डेटा पुन्हा भेटणार नाही. त्याचे सर्व मेसेज आणि डॉक्युमेंट्स डिलीट होतील.

 

News English Summary: The instant messaging app WhatsApp is all set to re-impose privacy-related terms and policies on its platform, despite huge criticism over the new privacy policy at the start of the new year. The company is once again sending notifications to users about the new policy and asking them to accept the policy by May 15. The question arises as to what will happen if you do not accept the policy. WhatsApp has given important information about this on its support page.

News English Title: Whatsapp re impose privacy policy related terms in India news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x