25 April 2024 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका

Sanjay Rathod, wrong queue box, Pooja Chavan

यवतमाळ, २३ फेब्रुवारी: चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.

यावेळी संजय राठोड म्हणाले की, ‘पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात असून, हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका, अशी विनंती संजय राठोड यांनी हातजोडून केली. राठोड पुढे म्हणाले की, ‘पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे हे राजकारण आहे’, असे राठोड म्हणाले.

यावेळी संजय राठोड यांनी अरुण राठोडसोबत असलेल्या फोटोवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका’, असे ते म्हणाले.

 

News English Summary: An inquiry will reveal the truth. I have nothing to say today. My work will continue as before, said Forest Minister Sanjay Rathod. Sanjay Rathod, who has been unreachable for a long time since he was named in the Pooja Chavan suicide case, arrived at Pohardevi today. There he visited Sewalal Maharaj. After that, Rathod spoke for the first time through the media.

News English Title: Do not let me stand in the queue box because of an incident news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x