29 March 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Health First | अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर सब्जा फायदेशीर

Acidity benefits, Basil seeds Sabja, health article

मुंबई, २५ फेब्रुवारी: तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.

अ‍ॅसिडीटवर फायदेशीर:
सब्जा हा थंड असतो. त्यामुळे तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी प्या यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी:
सब्जामुळे टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी होतो. जेवणापूर्वी सब्जा घ्या यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

त्वचेसाठी फायदेशीर:
प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेवरील अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. सोरायसीस या त्वचेच्या रोगावर सब्जा फायदेशीर आहे. सब्जा पावडर २ मोठे चमचे खोबरेल तेलात मंद आचेवर १ मिनिट शिजवा. हे मिश्रण लावल्यास लगेच आराम मिळतो.

केसांसाठी फायदेशीर:
प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
१ लीटर पाण्य़ात एक चमचा सब्जाच्या बिया भिजवून ठेवाव्या हे पाणी रोज प्यायल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

 

News English Summary: Basil seeds are very good for health. Vegetables contain proteins, carbohydrates, vitamins A, C, E, B, as well as magnesium, fiber, calcium and potassium. Frequent acidity, indigestion, sabza is beneficial for weight control, improves digestion, but also beneficial for skin and hair.

News English Title: Acidity benefits of basil seeds Sabja health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x