16 April 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
x

Health First | दिवसांतून २ अंड्यांपेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्यास घातक

Eating, 2 eggs, daily, Risk of death

मुंबई, २५ फेब्रुवारी: आहारात अंड्यांचा समावेश करावा असं आवर्जून सांगितलं जातं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा नेहमीच आरोग्यासाठी घातक असतो. दिवसांतून दोन अंड्यांपेक्षाही अधिक अंडी खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक असतं असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे लवकर मृत्यू होणं किंवा हृदय विकार संबधीत समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.

अमेरिकेतल्या ३० हजारांहून अधिक व्यक्तीचं आरोग्य, जीवनशैली आणि आहार यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकन मेडिकल असोशिएशनच्या मासिकात अंड्यांसंबधी हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

मर्यादेपेक्षाही अधिक अंड्यांच्या सेवनानं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं याचा परिणाम तब्येतीवर होतो अशी माहिती प्राध्यापक कॅथरिन टुकर यांनी दिली. अमेरिकेतल्या कृषी विभागाच्या माहितीनुसार एका मोठ्या अंड्यात २०० मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असतं. जर दिवसांतून ३०० मिलीग्रॅमहून अधिक कोलेस्टेरॉल पोटात गेलं तर हृदयविकारासंबधित आजाराचा धोका हा १७ % नीं वाढतो. तर मृत्यूचा धोका हा १८ % नीं वाढतो.

त्यामुळे दिवसांतून तीन पेक्षा अधिक अंड्यांचा समावेश आहारात करणं टाळावा त्याचप्रमाणे आहार हा नेहमी संतुलित असावा असा सल्ला कॅथरिन यांनी दिला आहे.

 

News English Summary: Eggs should be included in the diet. Eggs are high in protein. But the excess of anything is always harmful to health. According to a recent study, eating more than two eggs a day is dangerous to health. This increases the risk of premature death or heart problems.

News English Title: Eating more than 2 eggs a daily can increase the risk of death news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x