29 March 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Marathi Movies | मुंबईत रंगला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२०

Planet Marathi, Marathi Filmfare Awards 2020, Ceremony in Mumbai

मुंबई, ०१ मार्च: Marathi Filmfare Awards 2020, मराठी सिनेसृष्टीला वेध लागलेल्या ‘ब्लॅक लेडी’ चा पुरस्कार म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2021 रविवारी (28 फेब्रुवारी) मुंबईत दिमाखात पार पडला. यात मराठीसह अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, एकाच ठिकाणी जमले होते. ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. या फिल्मफेअर सोहळ्याचे सूत्रसंचालनाची धुरा यंदा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव या मातब्बर कलाकारांनी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सर्वांचेच चांगले मनोरंजन केले. (Planet Marathi Filmfare Awards 2020 Ceremony was held in Mumbai on Sunday)

या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित प्रभाकर याला पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दोन अभिनेत्रींना विभागून देण्यात आला. यात आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी भाग्यश्री मिलिंद हिला तर सोनाली कुलकर्णी हिला हिरकणी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आनंदी गोपाळसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला. (Anandi Gopal was adjudged the best film of the festival. Lalit Prabhakar won the award for Best Actor)

येथे पाहा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांची नावे:

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)
  • सर्वोत्कृष्ट लिरिक्स- क्षितीज पटवर्धन (खारी बिस्किट)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (खारी बिस्किट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- शुभंकर तावडे (कागर)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- बाबा
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (कागर)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नीना कुलकर्णी (मोगरा)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शाल्मली खोलगडे (गर्लफ्रेंड)
  • सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंग (बाबा)
  • सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- सौरभ भालेराव (गर्लफ्रेंड)
  • सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त)

तसेच पौर्णिमा ओक यांनी फस्तेशिकस्त चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

 

News English Summary: Marathi Filmfare Awards 2020, Marathi Filmfare Awards ‘Black Lady’, the Filmfare Awards Ceremony 2021 was held in Mumbai on Sunday (February 28). It was attended by many Bollywood stars including Marathi. Many veteran actors, singers, directors, musicians, lyricists of Marathi cinema had gathered at one place for this event. Who further enhanced the beauty of the event. This year, Ameya Wagh and Siddharth Jadhav were the hosts of this Filmfare ceremony. His excellent hosting entertained everyone well.

News English Title: Planet Marathi Filmfare Awards 2020 Ceremony was held in Mumbai on Sunday news updates.

हॅशटॅग्स

#MarathiMovie(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x