29 March 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

भोसरी भूखंड प्रकरण | फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा - अंजली दमानिया

Devendra Fadnavis,  Eknath Khadse, Bhosari Land Case, Anjali Damania

मुंबई, ०२ मार्च: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कथित सहभाग असलेल्या भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात विशेष न्यायालयाने साक्षीदार म्हणून विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच भोसरी भूखंड भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात संबंधित मागणी केली. भोसरी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश डी. एस .झोटिंग यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही दमानिया यांनी मांडली. आता 8 मार्च रोजी याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत नेमकी काय निर्णय देणार ते महत्वाचं ठरणार आहे.

 

News English Summary: Social activist Anjali Damania has demanded that the special court record the statement of the present Leader of Opposition and then Chief Minister Devendra Fadnavis as a witness in the Bhosari plot misappropriation case involving former minister and senior NCP leader Eknath Khadse. He also said that the Anti-Corruption Bureau (ACB) should use the report of the Jotting Committee as a reference for the Bhosari plot corruption case.

News English Title: Record Devendra Fadnavis statement as witness in Eknath Khadse Bhosari land case demand by Anjali Damania news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x