20 April 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | संधीवाताचा त्रास आहे? | ओवा आणि आलं गुणकारी उपाय

Carom seeds, Ginger, Joint pain, health article

मुंबई, ०५ मार्च: आपल्या शरीरात गुडघे, खांदे किंवा शरीराच्या इतर भागातील सांधे दुखत असल्यास किंवा सांध्यांना सूज येत असल्यास सतर्क व्हा, कारण हे दुखणं संधीवात असण्याचं लक्षणं असू शकतं. संधीवात हळूहळू वाढत जाऊन चालण्या-फिरण्यासही समस्या होऊ शकते. शरीरात वाढणारं यूरिक ऍसिड संधीवाताचं प्रमुख कारण ठरु शकतं. यूरिक ऍसिडचे कण हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यानंतर दुखणं आणि सूज वाढू लागते. (Carom seeds and ginger for joint pain health article)

संधीवातासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. संधीवातासाठी आलं आणि ओवा हे पदार्थ गुणकारी ठरतात. (Some home remedies can also be beneficial for rheumatism)

  1. एका भांड्यात दीड कप पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा ओवा आणि एक इंच आल्याचा तुकडा कुटून टाका. हे मिश्रण 6 ते 7 मिनिटं उकळवा. ओवा आणि आल्याचा अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर हे पाणी गाळून प्या.
  2. दिवसातून दोन वेळा हे पाणी पिऊ शकता. यामुळे शरीरात घाम येईल आणि यूरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होईल.

एरंड्याचं तेल (Castor oil):
एरंड्याचं तेल हलकं गरम करुन ते दुखत असलेल्या सांध्यांवर लावून हलकं मालिश केल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे यूरिक ऍसिड तुटून बाहेर येण्यास मदत होते. त्याशिवाय या तेलामुळे दुखणं आणि सूजही कमी होऊ शकते.

लसून (Garlic):
संधीवातावर लसूनही गुणकारी मानला जातो. दररोज लसनाचं सेवन केल्याने संधीवातावर काही प्रमाणात आराम मिळू शकतो. कच्चा लसणीच्या तीन ते चार पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्यास गुणकारी ठरु शकतं.

 

News English Summary: Be careful if you have pain or swelling in the joints of the knees, shoulders or other parts of the body, as this pain may be a sign of arthritis. Rheumatoid arthritis can also be a problem for walking slowly. Increased uric acid in the body can be a major cause of arthritis. Uric acid particles gradually accumulate in the joints, followed by pain and swelling.

News English Title: Carom seeds and ginger for joint pain health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x