29 March 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

Bhulekh Mahabhumi | डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ खाते उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

Digital Signature, 8A Utara, online download, MahaBhulekha website

मुंबई, ०७ मार्च: एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते. मात्र आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 8-अ काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

डिजिटल 8-अ (खाते उतारा):

  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं यंदाच्या महसूल दिनापासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून दिला आहे.
  • तो काढण्यासाठी प्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर क्लीक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.
  • यावर तुम्ही क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • या पेजचं शीर्षक आहे “Download facility for Digitally Signed 7/12, 8-A and Property card.”
  • याचा अर्थ इथं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा, 8-अ आणि प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करू शकता.
  • पुढे या पेजवर स्पष्ट शब्दांत सूचना दिली आहे की, “डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.”

 

 

  • याचाच अर्थ पीक कर्ज, पीक विमा आणि इतर अनेक शेतीसंबंधीच्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी डिजिटल सातबाराउतारा आणि 8-अ खाते उतारा अधिकृतपणे वापरू शकतात.
  • आता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा काढला असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं New User Registration या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला Personal information म्हणजेच वैयक्तिक माहिती द्यायची आहे.

 

  • यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव सांगायचं आहे. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.
  • त्यानंतर Occupation मध्ये तुम्ही काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
  • यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
  • वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर Address Information म्हणजे पत्त्याविषयी माहिती सांगायची आहे.
  • यामध्ये Flat No (घर क्रमांक), Floor Number (गावाकडे राहत असाल तर ग्राऊंड फ्लोअर), Building Name (घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.)
  • त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
  • पुढे Street Road (गल्लीचं नाव), Location (गावाचं नाव), City Area (तालुक्याचं नाव) टाकायचं आहे.
  • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग-आयडी तयार करायचा आहे.
  • समजा मी Shrikant@1996 हा लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर Check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.
  • तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात,त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे.
  • त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. Captcha म्हणजे तुम्ही ज्या मशिनीवर माहिती भरत आहात, मग ती मोबाईल असो किंवा कॉम्प्युटर, त्या मशिनीला तुम्ही यंत्र किंवा रोबोट नसून माणूस आहात, हे पटवून द्यायचं असतं. त्यासाठी Captcha समोर दिसणारे आकडे पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.
  • सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर “रेजिस्ट्रेशन कम्प्लीट” असा मेसेज येईल आणि मग तुम्हाला “क्लिक हेअर” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed 8-A” हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता.
  • या पर्यायावर क्लिक केलं की “डिजिटल स्वाक्षरीत 8-अ” असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every 8A. This amount will be deducted from available balance. “
  • याचा अर्थ प्रत्येक 8-अ साठी 15 रुपये शुल्क आकारलं जाईल आणि ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
  • आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.
  • ते कसे करायचे तर त्यासाठी खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला 15 रुपये इतकी रक्कम टाकून Pay Now या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • पुढे confirm या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्ही हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे जमा करू शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले असतात.
  • त्यानंतर डिजिटल 8-अच्या फॉर्मवर परत गेले, तर तिथं तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याचं दिसेल.
  • आता डिजिटल सहीचा 8-अ मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.
  • यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर, तुमचं पहिलं, मधलं किंवा शेवटचं नाव यापैकी काही एक माहिती टाकायची आहे.
  • त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ तुमच्यासमोर ओपन होईल.
  • या आठ-अ उताऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, “हा खाते उतारा अभिलेख सातबाराच्या डिजिटल स्वाक्षरीत डेटावरून तयार झाला असल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.”
  • या 8-अ वर तुम्हाला Digitally Signed या पर्यायावर मोठ्या आकारात बरोबरची खून केलेली दिसेल, याचा अर्थ हा आठ-अ डिजिटल स्वाक्षरीत तयार झाला आहे.

 

News English Summary: A farmer’s land can be divided into different group numbers. The farm land information in all these group numbers is collectively recorded on 8-A i.e. account transcript.

News English Title: Digital Signature 8A Utara online download from MahaBhulekha website news updates.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x