25 April 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील
x

गोसेखुर्द प्रकल्पाबाबतचं वचन मुख्यमंत्र्यांनी पाळलं | 1 हजार कोटी मंजूर | डिसेंबर 23 डेडलाईन

Maha Budget 2021-22, Gosikhurd Dam

मुंबई, ०८ मार्च: करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये स्वतः मुखयमंत्र्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी देखील संवाद साधला होता. त्यावेळी हा प्रकल्प २०२३ पर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आजच्या बजेटमध्ये त्यासाठी १ हजार कोटीची तरतूद करत प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे.

  1. सहकार-पणन आणि सिंचनासाठी विशेष तरतुदी:
  2. जलसंपदा विभागासाठी 12951 कोटी रुपयांची तरतूद
  3. जलसंपदा विभागाच्या 278 कोटींच्या प्रकल्पांचे काम सध्या सुरू
  4. सहकार आणि पणन विभागासाठी 1284 कोटी
  5. प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या अंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी
  6. गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी मंजूर, डिसेंबर 23 अखेर पूर्ण करणार
  7. 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर

 

News English Summary: Maharashtra Budget 2021-22 was presented by Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar in the Legislative Assembly. This is the second budget of the Maha Vikas Aghadi government in the state. Deputy Chief Minister Ajit Pawar started presenting the budget in the Assembly at 2 pm. Minister of State for Finance Shambhuraj Desai will present the budget in the Legislative Council.

News English Title: Maha Budget 2021 22 one thousand crore provision made for Gosikhurd Dam news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x