25 April 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

MPSC Exam | राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, MPSC exam

मुंबई, ११ मार्च: येत्या १४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली.

याच रोषातून ‘एमपीएससी’च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व ‘एमपीएससी’चा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये उडी घेत राज्य सरकारला जाब विचारत निर्णय मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान याच विषयावरून प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय, त्यामुळेच लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात चीड आहे. मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवला पाहिजे, ते दिसत नाही. OBC, SC, ST विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करतोय, उद्धव ठाकरे कणा दाखवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ताबडतोब घ्या, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

News English Summary: An announcement was made through a circular to postpone the MPSC examination to be held on March 14. And this decision has ruined the happiness of the candidates preparing for the exams. The postponement of the MPSC exams earlier also sparked a single wave of outrage among the already frustrated students.

News English Title: Prakash Ambedkar reaction on MPSC exam postponed by MPSC commission news updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x