26 April 2024 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | प्रवासात आणि ऑफिसमध्ये ईयरफोन लावता | मग हे वाचा

earphones, dangerous, Health Article

मुंबई, १६ मार्च: अनेक जण ऑफिसला जाताना, प्रवासात असताना ईयरफोनवर गाणी ऐकणं पसंत करतात. अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

मोबाईल हेडफोन, इयरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय वर्तुळातून नोंदविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांतच 18 ते 30 वयोगटांतील 40 टक्के तरुणांमध्ये कानांचे आजार वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत लावून ठेवलेले हेडफोन, इयरफोन व ब्लूटूथमुळे कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्‍य, चिडचिड यामुळे मानसिक आजारही बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हृदयरोग आणि कर्करोग:
दररोज ईयरफोनचा वापर करणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याने हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे दररोज असं होत असल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. याशिवाय ईयरफोनमुळे कर्करोग होण्याचाही धोका संभवतो. ईयरफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हा धोका, नुकसान होण्याची शक्यता असते.

डोकेदुखी आणि झोप न येणे:
ईयरफोनमधून निघणारे रेडिएशन आणि मॅग्नेटिक इफेक्ट डोकेदुखीचा त्रास वाढवतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या रेडिएशनचे मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतात.

कमी ऐकू येणे:
ईयरफोनचा अधिक वापर कल्याने कानांवर अधिक दाब पडतो. व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबल इतकी असते. मात्र, सतत प्रमाणापेक्षा अधिक ईयरफोन वापरल्याने ऐकण्याची क्षमता ४० ते ५० इतकी होते. त्यामुळे ईयरफोनचा अतिवापर बहिरेपणा येण्याची शक्यता असते.

इन्फेक्शन:
ईयरफोन किंवा हेडफोनचा सतत वापर केल्याने इन्फेक्शनही होऊ शकते. अनेकदा लोक दुसऱ्याचे ईयरफोन वापरतात. अशामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो दुसऱ्यांचे ईयरफोन वापरणं किंवा इतरांना ईयरफोन देणं टाळावे.

 

News English Summary: Many people like to listen to songs on earphones while going to the office, while traveling. Many have a habit of wearing earphones while walking or exercising. But excessive use of earphones can be very dangerous for the body. Overuse of earphones can be unknowingly harmful to the body and can lead to a serious risk of serious illness.

News English Title: Earphone can cause some disease health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x