25 April 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

महाराष्ट्राबद्दल द्वेष? | पाकिस्तानला कोरोना लस देण्याचा निर्णय | आणि महाराष्ट्राच्या मागणीवर तापले?

Maharashtra, Modi govt, Vaccination program

मुंबई, १७ मार्च: देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारकडून बाहेरच्या देशांमध्ये लस निर्यात केली जात आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारचे कान टोचले होते . पहिल्यांदा देशाची गरज पुर्ण करा आणि त्यानंतर परदेशात लस पाठवण्यात यावी. अशी टिप्पणी कोर्टाने केली होती. विशेष म्हणजे मोदी सरकारने नुकतीच पाकिस्तानला कोरोना लसीचे ४५ लाख डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. विशष म्हणजे महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्राकडे अधिक डोसची मागणी करताच भडकलेले केंद्रीय मंत्री पाकिस्तानच्या बाबतीत आनंदी होते का असा प्रश्न पडला आहे.

 

News English Summary: A few days ago, the Delhi High Court had pierced the ears of the Modi government in this regard. First meet the needs of the country and then the vaccine should be sent abroad. Such a comment was made by the court. In particular, the Modi government has recently decided to supply 45 lakh doses of corona vaccine to Pakistan. In particular, the question has arisen as to whether the Union Minister was happy about Pakistan when the Maharashtra MPs demanded more doses from the Center.

News English Title: Maharashtra Vs Modi govt over vaccination program news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x