29 March 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

फडणवीसांनी सायबर गुन्हे शाखेत ब्रिजेश सिंह यांना आणून स्वतःच्याच मंत्र्यांवर पाळत ठेवलेली - राष्ट्रवादी

NCP, Devendra Fadnavis, Police department

मुंबई, १९ मार्च: सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या आणि आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले. तसेच, फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा 7 लाख 70 हजार रुपये खर्च होत होते, असाही दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.’

दुसऱ्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे, ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या रास्वसंघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ७,७०,००० रु खर्च होत होते.त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकारबाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होती.’

 

News English Summary: The Nationalist Congress Party (NCP) has leveled serious allegations against opposition leader Devendra Fadnavis, who has been embroiled in an aggression against the Mahavikasaghadi government over the Sachin Waze case. When he was the Chief Minister, Devendra Fadnavis tried to keep an eye on the ministers in his own government

News English Title: NCP made serious allegations on Fadnavis regarding misuse of Police department news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x