26 April 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अपक्ष आमदार येड्रावकर यांनी भाजपासोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी त्यांची भेट घेतली होती

Minister Jitendra Awhad, IPS Rashmi Shukla

मुंबई, २५ मार्च: पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विट करुन हा आरोप केला. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता रश्मी शुक्ला आणि भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या दोन तीन दिवसांच्या निवेदनात सातत्याने रश्मी शुक्ला यांचा उल्लेख होताना दिसत होता. पोलिस आणि प्रशासनातील ज्या उजव्या मंडळींचा उल्लेख करतोय त्यामध्ये प्राधान्याने उल्लेख करावे असे नाव म्हणजे रश्मी शुक्ला. यावर वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी देखील म्हटलं होते की, “‘त्या’ नुसत्या फोनच टॅप करत नव्हत्या, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपक्ष आमदारांना भाजपकडे आणण्यासाठीही सक्रिय होत्या. आता जितेंद्र आव्हाड यांनी तर एका अपक्ष आमदारचं नाव घेतल्याने शंका बळावल्या आहेत.

 

News English Summary: Shirol’s independent MLA Rajendra Yedravkar had personally met Rashmi Shukla to persuade her to stay with the BJP without joining the Mahavikas Aghadi. Rashmi Shukla called him and tried to put pressure on him said minister Jitendra Awhad.

News English Title: Minister Jitendra Awhad made serious allegations on IPS Rashmi Shukla news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x