20 April 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | सीजन आलाय | पण काय आहेत आंब्याचे फायदे आणि तोटे

Mango, health article

मुंबई, ३१ मार्च: सध्या बाजारात सर्वत्र आंबे दिसतात. आंबा सर्वांनच्याच आवडीचा फळ आहे. उन्हाळा आणि आंबा हे तर समिकरण तयार झालं आहे. आंबा हे फळ आपण अत्यंत आवडीने खातो. पण आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का?

प्रथम आंबा खाण्याचे फायदे;

  1. आंबा खाल्ल्याने वजन वाढते असा समज असतो. मात्र तो चुकीचा असून वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
  2. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायलाच हवे.
  3. आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
  4. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
  5. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
  6. आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.

आंबा खाण्याचे तोटे;

  1. आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.
  2. एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते.
  3. आंब्याच्या देठाजवळ असणारा द्रव पदार्थ खाण्याआधी साफ करा. तो तसाच खाल्याने घशाला त्रास होऊ शकतो.
  4. आंबा गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.
  5. ज्या लोकांना संधिवात किंवा सायनस आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आणि सायनसचा आजार वाढू शकतो.
  6. आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.

 

News English Summary: Mangoes are now found everywhere in the market. Mango is everyone’s favorite fruit. Summer and mango are the equation. Mango is a fruit we love to eat. But do you know the advantages and disadvantages of mango on the body?

News English Title: Mango eating benefits and other effects on body health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x