24 April 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

फायजरची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक | कंपनीचा दावा

Biontech Pfizer, Corona virus vaccine, For children

मुंबई, ३१ मार्च: कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, कंपनीने बुधवारी म्हटले की, अमेरिकेत 2,250 मुलांवर झालेल्या फेज थ्री ट्रायल्समध्हे ही लस 100% परिणामकारस असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

व्हॅक्सीनचे ट्रायल्स ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाले होते. याचे परिणाम आता समोर आले आहेत. या लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा 12 वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली होती. तो कोरोना व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्वात कमी वयांच्या मुलांमध्ये सामील आहे. त्याचे वडील शरत डॉक्टर असून, कोव्हिड व्हॅक्सीनच्या ट्रायल्समध्ये सामील होते. अभिनवने अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये लस घेतली.

कंपनीने मागच्या महिन्यात 6 महीन्यांपासून 11 वर्षापर्यंतच्या मुलांना लस घेण्यासाठी फेज 1,2,3 च्या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास सुरू केला आहे. यादरम्यान, 5 ते 11 वर्षांच्या मुलांना पहिला डोस देण्यात आला. कंपनी पुढच्या आठवड्यापासून 2 ते 5 वर्षांच्या मुलांना लस देण्याच्या तयारीत आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना दिवसेंदिवस रुप बदलत असल्यानं याचा धोका यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. यापुढील काळात कोरोना व्हायरसचे म्युटेशन गंभीर स्वरुपाचे तयार होऊ शकतात आणि याचा लहान मुलांना खूप धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

News English Summary: Pfizer Bioentech, a pharma company that makes corona vaccines, claims that their vaccines are 100% effective on children between the ages of 12 and 15. According to CNN, the company said Wednesday that the vaccine has been shown to be 100% effective in Phase Three trials of 2,250 children in the United States. A month after giving the second dose, their body is showing a good antibody response.

News English Title: Biontech Pfizer Corona virus vaccine effective for children news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x