29 March 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ केल्याचा शेरा मारून फाईल सरकवायचे पराक्रमी मंत्री - सविस्तर

Former CM Devendra Fadnavis, Prakash Mehta, SRA scam

मुंबई, ०१ एप्रिल: सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांवर पदाच्या गैरवापर केल्याचा आरोप भाजपकडून करणं सुरु आहे. मात्र भाजपमधील म्हणजे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे पराक्रम देखील मोठे आहेत ज्याचा अनेकांना विसर पडला असावा. तत्कालीन फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नेमकं का हटविण्यात आलं होतं, याचं कोणताही स्पष्टीकरण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी अद्यापही दिलेलं नाही.

कारण फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणी[प्रचंड वाढल्या होत्या. मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल
कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी होणार होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच ही घोषणा केल्याने मेहता यांचे पाय खोलात असल्याचे सिद्ध झालं होतं.

एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम 293 अन्वये त्यावेळच्या विरोधकांनी थेट विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट सभागृहात केला होता.

3 केच्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत तत्कालीन गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी संबधित फाईल मंजूर करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अवगत (माहिती दिल्याचा) केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे संबंधित प्रकल्पाला प्रकाश मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रस्तावाला आपण कोणतीही अनुमती दिली नसल्याचं, तसंच आपली तोंडी परवानगीही घेतली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्याला हे प्रकरण कळल्यानंतर हा प्रस्ताव आपण रद्द केला असल्याचंही फडणवीसांनी सभागृहात सांगितलं होतं. त्यामुळे फडणवीस सरकारमधील मंत्री कसे स्वतःच मुख्यमंत्र्यांच्या नावे अवगत शेरे मारत होते याचा धक्कादायक खुलासा झाला होता. तसेच फडणवीसांच्या काळात मंत्र्यांना किती स्वातंत्र्य होतं हे देखील अधोरेखित झालं होतं. मात्र प्रकरण शेकणार हे पासून फडणवीसांनी हात झटकल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं.

आपण गृहनिर्माण विभागाच्या काही फायली घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला गेलो होतो, तेव्हा एम. पी. मिल कम्पाऊंडची फाईल नव्हती. मात्र ही फाईल घेऊन गेल्याच्या समजुतीतून आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारल्याचे सांगत आपल्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करु नये, असं प्रकाश मेहता यांनी हास्यास्पद उत्तर सभागृहात दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच त्यांना अवगत केल्याचा शेरा मारणं, हे मुख्यमंत्री सांगत असलेल्या पारदर्शक कारभारावर शंका उपस्थित करणारं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय मंत्री फायलीवर खोटे शेरे मारत असतील तर मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा कोणताही अंकुश नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे खरोखरच पारदर्शक कारभार असेल तर मेहता यांची चौकशी करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती.

प्रकाश मेहता यांना पदावर ठेवायचे की नाही ते तुम्ही ठरवा, पण हे प्रकरण गंभीर असून चौकशी झाली नाही, तर फडणवीस सरकारची पारदर्शकता आणि विश्‍वासार्हतेला तडा जाईल, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मेहतांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसताना त्यांनी शेरा मारला. प्रकरण भोवणार हे लक्षात येताच फडणवीसांनी प्रकाश मेहता यांना मंत्रिपदावरून हटवलं, मात्र या प्रकरणात पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरीसुद्धा या प्रकरणाची निश्‍चित चौकशी केली जाईल. चौकशी कशी करायची ते गटनेत्यांशी चर्चा करुन ठरवू, असं फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र पुढे काहीच निष्पन्नं झालं नव्हतं. फडणवीस सरकारच्या तत्कालीन मंत्र्यांची अशी अनेक प्रकरणं आहेत जी फडणवीसांनी पारदर्शकपणे कधीच समोर येऊ दिली नाहीत.

 

News English Summary: At present, the BJP is accusing the ministers in the Maha Vikas Aghadi government of abusing their posts. But the feats of the ministers in the BJP, the Fadnavis government, are also great, which many may have forgotten. The then Chief Minister and current Leader of the Opposition Fadnavis has not yet given any explanation as to why the ministers in the then Fadnavis government were removed.

News English Title: Former CM Devendra Fadnavis action over former minister Prakash Mehta SRA scam news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x