19 April 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

कोरोना संकट | संकटावर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे - शरद पवार

NCP, Sharad Pawar, Guidelines, Corona pandemic

मुंबई, ५ एप्रिल: कोविड १९ च्या महामारीने गंभीर रुप घेतले असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केले.दरम्यान अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे असे आवाहनही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलिस व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. जनतेने राज्यशासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सूचना कसोशीने पाळाव्यात. सभासमारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम टाळावेत असेही शरद पवार म्हणाले आहेत.

 

News English Summary: In a letter, National President of Sharad Pawar appealed to the people of the state to cooperate and follow the guidelines given by the government to overcome the crisis of Covid 19.

News English Title: NCP president Sharad Pawar appealed to the people of the state to cooperate with guidelines of corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x