29 March 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Health First | जाणून घ्या किवी फळाचे गुणधर्म । सविस्तर वाचा

immunity booster kiwi

मुंबई ६ एप्रिल :किवी फळ दिसायला चिकू सारखे दिसते. हे ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच हे फळ डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप उपयुक्त ठरतो.

किवी हे फळं आरोग्यासाठी कसं आहे लाभदायी
1. अँटिऑक्सिडंट्समुळे होतात आजार दूर
थोडंसं भुऱ्या रंगाची परत असणारं अंडाकार आकाराचं हे किवी फळ म्हणजे अँटिऑक्सिडंट्ससाठी पॉवरहाऊस आहे. काही दिवस तुम्ही रोज जर हे एक फळ खाल्लंत तर तुमच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे. किवीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील आजार दूर होतात.

2. विटामिन सी चं प्रमाण आहे जास्त
किवीवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, किवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला माहीत आहे का? साधारण 100 ग्रॅम किवीमध्ये 154 टक्के इतक्या प्रमाणात विटामिन सी असतं. जे विटामिन सी चा स्रोत समजण्यात येणाऱ्या संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

3. प्रतिकारशक्ती क्षमता वाढते
याचबरोबर तुम्ही निरोगी राहण्यासाठी सर्वात गरजेचं असणारं विटामिन ए देखील किवी या फळामध्ये अंतर्भूत असतं. ही दोन्ही विटामिन्स अप्रतिम अँटिऑक्सिडंट्स असून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. किवीमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपली इम्यून सिस्टिम अर्थात प्रतिकारशक्ती क्षमता अधिक चांगली होण्यास मदत होते. तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते.

4. बॅक्टेरियापासून करते संरक्षण
बदलत्या वातावरणानुसार जे बॅक्टेरिया पसरतात त्याने इन्फेक्शन होत असतं. पण किवी त्यापासून संरक्षण करण्यास मदत करतं. तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये किवीचा समावेश करून घेतलात तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम अर्थात पचनक्रिया मजबूत होऊन आजारांवर मात करण्यासाठी तुमच्या शरीराला अधिक बळ मिळतं. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर निघून जातात.

5. फायबरयुक्त असल्याने ब्लडशुगर नियंत्रणात
किवीमध्ये फायबर असतं आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार, सीव्हीडी अथवा कोरोनरी हार्ट आजार होण्याची शक्यता कमी होते. हाय फायबरयुक्त असल्यामुळे किवी हे रक्तदाब, कोलस्ट्रॉल आणि ब्लडशुगर नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं.

News English Summary: The kiwi fruit looks like a chiku. It is rich in Vitamin C. Kiwi fruit is now readily available in the market. The fruit is shaped like a potato and looks like a chickpea. According to doctors, eating one kiwi fruit every day prolongs a person’s life. Kiwi fruit has all the useful ingredients. Which the body needs. Fruits are high in vitamin C, which helps protect against many diseases. At the same time, this fruit also eliminates the problem of depression. This fruit is very useful for diabetics.

News English Title: Eat kiwi fruit and boost your immunity news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x