19 April 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

राज्यात भाजपच्या १०५ आमदारांना निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, BJP, Vaccination

मुंबई, ९ एप्रिल: एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यात लसींचा तुटवडा भासत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच विषयाला अनुसरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपमधील मराठी नेत्यांवर जोरदार टीका केली.

भारतीय जनता पक्षाला याच राज्यातील जनतेनं मतं दिली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनंच निवडून दिलंय. मग, या 105 आमदारांना मतदान दिलेले लोकं कोण आहेत, जो शब्द तुमच्या लोकांनी वापरलाय, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलंय, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र जेवढा तुमचा आहे, तेवढा आमचाही आहे. महाराष्ट्राची जनता जेवढी तुमची आहे, तेवढी आमचीही आहे. सगळ्यांचा आहे हा महाराष्ट्र, कुठल्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी महाराष्ट्रावर नाही, असेही राऊत यांनी म्हटले.

 

News English Summary: The people of this state have voted for the Bharatiya Janata Party. The 105 MLAs of the Bharatiya Janata Party have been elected by the people of Maharashtra. Then, who are the people who voted for these 105 MLAs, the words used by your people, he expressed his indignation.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut criticised BJP on politics on vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x