20 April 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Health First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे

benefits of neem

मुंबई ९ एप्रिल : अमेरिकन मेडिकल जर्नल पबमेडमधील रिपोर्टनुसार कडुंनिब हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. डायबिटीजमध्ये कडुनिंबाचा वापर हे काही नवीन नाही. भारताला मोठी आयुर्वेदिक परंपरा लाभली आहे. या आयुर्वेदात कडुनिंबाला मोठे स्थान आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर आयुर्वेदात केला जातो. तसेच भारतीय आयुर्वेदात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या मोठेमोठे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळस, कडुनिंब, हलद,आले आणि हजारो वनस्पतींचा वापर आयुर्वेदात केला जातो.

कडुलिंबाच्या पाल्याचा आयुर्वेदामध्ये औषधाच्या स्वरुपामध्ये उपयोग केला जातो. कडुलिंबाच्या तेलामध्येही औषधी गुणधर्माचा साठा आहे. याचे आपल्या त्वचेला भरपूर फायदे मिळतात.

कडुलिंब ही औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वर्षानुवर्षे उपयोग केला जातो. त्वचेशी संबंधित विकार कडुलिंबामुळे कमी होतात. चेहऱ्यावरील मुरुम, सोरायसिस, खाज सुटणे इत्यादी समस्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरणे हा रामबाण उपाय आहे. या तेलामुळे केसांची वाढ देखील चांगली होते.

असंख्य लाभ मिळवण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कडुलिंबाच्या तेलाचा समावेश करावा. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अमिनो अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिडचा समावेश आहे. या घटकांमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. कडुलिंबातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवरील बॅक्टेरियांचा खात्मा होण्यात मदत मिळते.

कडुनिंबाचे पान, त्यांचा देठ, कडुनिंबाचे मूळ, कडुनिंबाची फळेयांचा औषधात वापर केला जातो. कडुनिंबाचे खोड तर मलेरियासारखे आजार दूर करण्यासाठी केला जातो. कडुनिंबाच्या पानांमध्ये ग्लायकोसाईड्स आणि अँटी व्हायरल गुण असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय कडुनिंह शरारीतल ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

News English Summary: Neem is very beneficial for people with diabetes, according to a report in the American Medical Journal PubMed. This helps control blood sugar. The use of neem in diabetes is nothing new. India has a long tradition of Ayurveda. Neem has a big place in this Ayurveda. Every part of the neem tree is used in Ayurveda. Also in Indian Ayurveda there are many plants that are beneficial in eliminating major ailments. Basil, Neem, Turmeric, Ginger and thousands of plants are used in Ayurveda.

News English Title: Neem is very useful for various diseases news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x