16 April 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

.. तर कोविडचं वाढतं प्रमाण पाहता भारत दुसरा ब्राझील होईल - डॉ. एरिक फीगल-डिंग

Dr Eric Feigl Ding

नवी दिल्ली, १२ एप्रिल: देशात २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे देशात करोनाचा कहर वाढत असून सुप्रीम कोर्टालाही याचा मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे जगभरातील आरोग्य तज्ज्ञ भारतातील आकडेवारी पाहून धक्कादायक भविष्यकाळाची कल्पना देतं आहेत. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत 2,616 नवीन मृत्यूची नोंद झाल्यानंतर एकूण मृतांचा आकडा 3,51,334 वर पोहोचला आहे, अशी माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ब्रॅझिलमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13,445,006 वर पोचली आहे. ब्राझीलमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या साओ पाउलो येथे मृत्यचं तांडव सुरु असून येथे एकूण 82,407 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे भारतातील आलेख देखील झपाट्याने वाढत असून जागतिक पातळीवरील आरोग्य देखील भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. एपिडेमिओलॉजिस्ट अँड हेल्थ इकॉनॉमिस्ट डॉ. एरिक फीगल-डिंग यांनी एक आलेख शेअर करत भारतातील गंभीर आकडेवारीवरून चिंता व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माय गॉड इंडिया … आणि हे फक्त अधिक चाचणीमुळे नाही, तर अलिकडच्या महिन्यात पॉझिटिव्हिटी केसेस पाच पटीने वाढ झाली आहे. कोविड संकट मापदंडानुसार भारताची अवस्था ब्राझीलप्रमाणे होऊ शकते, असं धक्कादायक वक्तव्य ट्विटमध्ये केलं आहे.

 

News English Summary: My god India … and it’s not just more testing, because positivity had quintupled (5x) in recent month. India could be the next Brazil 🇧🇷 in terms of COVID19 crisis scale said Dr. Eric Feigl-Ding.

News English Title: Dr Eric Feigl Ding predict alert on covid pandemic in India comparing with Brazil news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x