25 April 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड | २४ तासांत १०२७ मृत्यू | १,८४,३७२ नवे बाधित

Corona Second wave

नवी दिल्ली, १४ एप्रिल: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड असल्याचं दररोज येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. दररोज नवनवे विक्रम नोंदवले जात असून, देशात मंगळवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात १ हजारपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतात कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० ते १३ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीपासून हे चित्र बदललं असून, अवघ्या दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे.

एकीकडे भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून आतापर्यंत 11 कोटी 10 लाख 33 हजार 925 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. तसेच पहिल्या तीन दिवसातच कोरोनाच्या एक कोटीपेक्षा लसी टोचण्याचा विक्रम करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत सांगण्यात आलंय की, देशात रोज 45,000 कोविड लसीकरण केंद्र सुरू असतात. मंगळवारी या केंद्रांच्या संख्येत जवळपास 21,000 ची वाढ करण्यात आली असून ती 67,893 इतकी करण्यात आली होती. लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी 30 लाख डोस, दुसऱ्या दिवशी 40 लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखाहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

 

News English Summary: The daily statistics show that the intensity of the second wave is much greater than the first wave of the corona. The ninth record is being recorded every day, with the country recording the highest number of cases so far on Tuesday.

News English Title: The intensity of the second corona wave is much greater than the first wave in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x