23 April 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा

Congress leader Rahul Gandhi

नवी दिल्ली, १६ एप्रिल: देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.

भारतात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 15 लाखांच्या पार झाली आहे. आता येथे 15 लाख 63 हजार 588 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश आहे. यावरुन आपण देशातील कोरोनाच्या कहराचा अंदाज लावू शकतो. या यादीमध्ये पुणे टॉपवर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी परिस्थिती आहे की, देशात जवळपास 120 जिल्ह्यांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांचा तुटवडा आहे. आता देशाला केंद्राकडून मोठ्या योजनांची अपेक्षा आहे. मात्र पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्यानंतर असं निदर्शनास आलं होतं की तो जाहीर करण्यापूर्वी कोणताही एक्झिट प्लान आखण्यात आला नव्हता. आता दुसरी लाट आल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्या लाटेत मोदी सरकारने केलेल्या घटनाक्रमवार भाष्य करत केंद्राची खिल्ली उडवली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi tweeted, “Central government’s cowardly strategy – first stage – to impose Tughlaq lockdown. The second stage – ringing the bell. The third stage is to sing the praises of God.

News English Title: Congress leader Rahul Gandhi target Modi govt after second wave of covid 19 news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x