24 April 2024 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
x

रुग्णांच्या जीवन मरणाशी संबंधित रेमडेसिवीरचा भाजप नगरसेवकाकडून काळाबाजार आणि मतदार जोडणीसाठी वापर

Remdesivir injection

मुंबई, २१ एप्रिल: भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला.

त्यांनी २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिविर ब्रुक फार्मा कंपनीकडून आणून ठेवले होते. त्यामुळेच राज्याच्या एफडीएने वारंवार विचारणा करूनही ब्रुक फार्मा महाराष्ट्रात इंजेक्शन्स देण्यास तयार नाही, असा गंभीर गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी इंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिरातीदेखील माध्यमांना दिल्या आहेत.

एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड‌्यंत्र आहे. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात त्यांचा गोरखधंदा सुरू होता. त्याचवेळी विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे लेखी तक्रार करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नसल्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: Shirish Chaudhary, a former BJP MLA from Jalgaon-Amalner and owner of Hira Group, along with his brother, stockpiled thousands of remedicivir injections at the Hira Executive Hotel in Nandurbar. On April 8 and 12, they lined up in Nandurbar, Jalgaon and Dhule districts to blackmail the injections.

News English Title: Remdesivir injection stocking in Maharashtra is serious issue in corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x