24 April 2024 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Health first | दररोज तीन अंडी खा आणि निरोगी रहा । नक्की वाचा

benefits of eggs

मुंबई २१ एप्रिल : अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.यामुळे तुम्ही जर दिवसांतून तीन अंडी खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्ही अनेक रोगांपासून दूर देखील राहू शकतात. यामुळे आजपासूनच आपण आहारामध्ये तीन अंडी घेण्यास सुरूवात करावी. अंड्याच्या पिवळ्या बलकातील घटक थेट आपल्या हृदयावर परिणाम करतात.

हार्मोन्ससाठीही फायदेशीर
अंड्यात शरीराला लागणारे खूप घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. इतकेच नाही तर आपल्या शरीरात स्रावणाऱ्या हार्मोन्ससाठीसुद्धा हे घटक खूप फायद्याचे ठरतात. अंड्याच्या बलकात कोलेस्ट्रॉल अढळते. जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल ह्रदयासाठी चांगले नाही असे काहीजण म्हणत असतात. परंतु, हेच कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात ग्रहण केल्यास ते शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते. यापासुनच स्टेरॉईड हार्मोन्स, टेस्टोस्टेरॉन एस्ट्रोजन आणि कोर्टिसोल बनत असते. जे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरते.

हार्टशाठी फायदेशीर फायदेमंद
अंड्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे आपल्या ह्रदय धडकण्याची गती नियंत्रीत केली जाते. तसेच यामुळे रक्त क्लॉट होण्याचा धोकाही कमी होतो. रक्तदाबही कमी होतो, धमण्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. या सर्वांचा परिणाम म्हणून आपले ह्रदय सुदृढ राहते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
अंडे खाण्याने माणसाला इतके पोषक घटक मिळत असतात. त्यासोबतच ते वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात . तुम्ही अंड्याचा नाष्टा करत असाल तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला वजन वाढवणारे अतिरिक्त जेवण कमी प्रमाणात जाते. याचा थेट परिणाम तुमच्या वजनावरती होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर
अंडी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते. अंड्यात ल्यूटेन नावाचा घटक असतो, जो आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असतो. जेक्सांथिन नावाचा घटक आपल्याला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांच्या घातक परिणामांपासून दूर ठेवते. यासोबतच अंड्यात व्हिटॅमिन ए आणि झिंकसुद्धा मुबलक प्रमाणात भेटते. जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.

हाडांसाठी उपयुक्त
अंड्यात व्हिटॅमिन डी, फॉस्फरस आणि झिंक मिळते, ते आपली हाडे मजबुत करण्यासीठी फायदेशीर ठरतात. अंड्यात शरीरासाठी खूप फायद्याचे असणारे लोहसुद्धा मुबलक प्रमाणात मिळते.

मेंदूसाठीही उपयुक्त
गर्भवती महिलेच्या गर्भातील शिशूच्या मेंदूच्या विकासासाठी अंडी खाणे खूप फायद्याचे ठरते. नवीन जन्मलेल्या बाळांसाठीही हे खूप महत्वाचे असते.

 

News English Summary: Eggs are very beneficial for your body. Also, it contains many types of nutrients. Eggs are a good source of high quality protein. Eggs are also very useful for the fitness of your muscles. In addition, eggs are very effective in controlling your blood sugar, strengthening the immune system and reducing weight.

News English Title: Eat eggs and stay healthy news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x