29 March 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

ज्या अदर पूनावालांनी लस बनवून नागरिकांमध्ये एक आशा निर्माण केली | त्यांना भाजप आमदार डाकू म्हणाला

BJP MLA Radhamohandas Agrawal

गोरखपूर, २२ एप्रिल: देशात 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी Co-Win पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. एक मेपासून या एज ग्रुपच्या लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल. Co-Win चीफ आर शर्मा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

यापूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठकीत 18+चे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीकडून जारी होणारे 50% डोज केंद्र सरकारला मिळतील आणि इतर 50% स्टॉक राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकले जाऊ शकेल. सध्या देशात 45 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण केले जात आहे. दरम्यान कोरोना आपत्तीत लस बनवताना अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने महत्वाची भूमिका बजावताना देशाच्या आणि जगाच्या मनात मोठ्या आशा निर्माण केल्या आहेत. मात्र भाजपच्या आमदाराने त्यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक विधान केलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ लसीची किंमत ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. अदर पुनावाला हे डाकू आहेत. केंद्र सरकारनं साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घेण्याची मागणी केलीय. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) कोविशील्ड लशीची नवीन किंमत नुकतीच निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने हे वक्तव्य केलंय.

 

News English Summary: Registration for the vaccination of people aged 18 and above in the country will start from April 24. Vaccines can be registered through the Co-Win portal. Vaccination of people of this age group will start from May one. Co-Win Chief R Sharma said this on Thursday.

News English Title: BJP MLA Radhamohandas Agrawal called Adar Poonawla Daku during who invented corona vaccine for nation India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x