28 March 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Zydus Cadila विराफीन औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी | ७ दिवसांत पेशंट निगेटिव्ह होण्याचा दावा

Zydus Cadila Virafin Gets Emergency Approval

नवी दिल्ली, २३ एप्रिल: अहमदाबादमधील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाच्या पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b, वीराफिन (इंजेक्शन) औषधाला कोरोना रुग्णांना देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून शुक्रवारी मंजुरी मिळाली आहे. या औषधामुळे सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

यापूर्वी कंपनीने दावा केला होता की, त्यांच्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये या औषधाचा 91% परिणाम दिसला आहे. या औषधामुळे ऑक्सीजनची पातळीदेखील वाढते. कंपनीचे म्हणने आहे की, त्यांनी कोविड-19 इंफेक्टेड रुग्णांवर पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b, वीराफिन औषधाचे क्लीनिकल ट्रायल केले. क्लीनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीवरील कंपनीच्या डॉक्यूमेंट्सनुसार, औषधाचा परिणाम जाणून घेण्यासाठी ट्रायल्स डिसेंबर 2020मध्ये सुरू केले होते. 250 रुग्णांना या ट्रायल्समध्ये सामील केले होते.

पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b थेरेपी नवीन औषध नसून, 2011 मध्ये हेपेटाइटिस C साठी वापरण्यात येणारे औषध आहे. तेव्हापासून या औषधामुळे अनेक क्रॉनिक हेपेटाइटिस B आणि C रुग्णांवर उपचार केले जातात.

 

News English Summary: Ahmedabad-based pharma company Zydus Cadila on Friday received approval from the Drug Controller General of India (DGCI) to administer pegulated interferon alpha 2b, verafin (injection) to corona patients. The company claims that the drug will cause an RT-PCR test in seven days.

News English Title: Zydus Cadila Virafin Gets Emergency Approval From Dcgi To Use In India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x