28 March 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

भारतात रोज ५ हजार मृत्यूचा अंदाज | जुलै अखेरपर्यंत ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात - वॉशिंग्टन विद्यापीठ संशोधन

India corona pandemic

वॉशिंग्टन, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते.

मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. एका दिवसात झालेल्या मृतांचा हा नवीन विक्रम आहे. देशात कोरोनाचे आकडे हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. या प्रकरणात आपण जगात 119 व्या क्रमांकावर आहे. जेथे सर्वात जास्त प्रकरणे येत आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पहिल्या लाटेपेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत असून, वाढत्या मृत्यूची संख्येनं काळजी भर टाकली आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे, असं असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

 

News English Summary: The India is estimated to have more than 5,000 deaths per day in mid-May. The Institute for Health Metrics and Evaluation (IHME) at the University of Washington has issued a warning.

News English Title: India is estimated to have more than 5000 deaths per day in mid May research by Institute for Health Metrics and Evaluation at the University of Washington news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x