28 March 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

ग्रामीण भागात बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत | तसंच मीडियावाले डायरेक्ट मोदींच नाव न घेता 'सिस्टिम' म्हणतात

NCP leader Rupali Chakankar

मुंबई, २८ एप्रिल | भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. जाणून घ्या परदेशी मीडिया हाऊस काय म्हणत आहेत..

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूमध्ये तीव्र प्रतिक्रिया बघायला मिळाली आली. व्यंगचित्रकार डेव्हिड रोव यांनी व्यंगचित्रात दाखवले की, भारत देश हत्तीइतकाच विशाल आहे. मात्र आता तो मरणाच्या दारात उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हत्तीच्या पाठीवर लाल सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डोक्यावर पगडी असून एका हातात माईक दिसतोय. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने 24 एप्रिलच्या आपल्या ओपिनियनमध्ये लिहिले आहे की, भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे सर्वात मोठे कारण म्हणजे निर्बंधांमधून मिळालेला दिलासा हे आहे. यामुळे लोकांनी महामारीला गांभीर्याने घेतले नाही. कुंभमेळा, क्रिकेट स्टेडियमवर मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले. कोरोनाचा नवीन प्रकार आणखी धोकादायक आहे.

मात्र देशातील सध्याच्या भीषण परिस्थितीतही भारतीय प्रसार माध्यमं मोदींवर थेट टीका किंवा मोदी सरकारचं थेट नाव घेताना दिसत नाहीत. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून प्रसार माध्यमांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. यासंदर्भात टीका करताना त्या म्हणाल्या की, “जसं ग्रामीण भागातील बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत तसंच मीडियावाले सुद्धा डायरेक्ट मोदींच नाव न घेता त्यांना ‘सिस्टिम’ म्हणतात”.

 

News English Summary: Even in the current dire situation in the country, the Indian media does not seem to be directly criticizing Modi or directly naming the Modi government. Following this, NCP’s women state president Rupali Chakankar has criticized the role of the media on Twitter. Criticizing the issue, she said, “Just as women in rural areas do not name their husbands directly, the media also calls them ‘systems’ without directly naming Modi.”

News English Title: NCP leader Rupali Chakankar criticized media over stand during corona pandemic against Modi govt news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x