29 March 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

एका दिवसात 2.70 लाख रुग्ण बरे झाले | तर 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले, 3646 रुग्णांचा मृत्यू

Maharashtra corona pandemic

नवी दिल्ली, २९ एप्रिल | देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत.

आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.

चिंताजनक वृत्त म्हणजे बुधवारी 3 लाख 79 हजार 164 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त 3.62 लाख रुग्ण समोर आले होते. या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,646 संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगलवारी 3,286 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

 

News English Summary: There is good news in the growing number of corona cases in the country. The number of people recovering from the infection has crossed 1.5 crore. So far, more than 1 crore 50 lakh 78 thousand people have been cured. In the last 24 hours, a record 2.70 lakh people have recovered.

News English Title: Single day rise of 379257 COVID 19 infections news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x